मतदान कार्ड असे करा डाउनलोड , 

           Download e-EPIC ,Voter Id  Download 






          मतदान कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर ते ८ ते १० दिवसात तुमचे  e मतदान कार्ड बनते

       त्यानंतर तुम्ही त्त्याची Pdf डाउनलोड करू शकतात व प्रिंट करून वापरू शकतात जोपर्यंत तुमचे मतदान कार्ड घरपोच येत नाही तोपर्यंत तर ते कसे काढायचे ते आपण या लेखात पाहणार आहोत 




१ )  यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://www.nvsp.in/ या site वर जावे लागेल 


२ ) नंतर तुम्हाला Register As A New User  या वर क्लिक करावे लागेल 




3) तुमचा Mobile Number येथे टाकायचा  व हा   capcha  खाली टाकायचा त्यानंतर तुमच्या  Mobile  वर  Otp  येईल तो टाकून आपल्याला Password बनवावा लागेल हा Mobile Number व Password तुम्हाला नंतर कामी येईल त्यानंतर लोगिन करावे लागेल 

४ ) लोगिन होताच तुमच्या समोर असा   Dashboard  दिसेल येथे खूप सारे Opctin आहेत पण आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी   E Epic Download या पर्यायावर क्लिक करावे लागेल 


५) आता तुम्हाला  E Pic Number (मतदान कार्ड नंबर)  /Form Refrence Number टाकावा लागेल (मतदान कार्ड साठी फॉर्म भरला त्याचा Refrence Number) टाकावा लागेल तो टाकल्यानंतर तुम्हाला  तुमचे राज्य निवडावे लागेल  (Select State ) निवडल्यानंतर Serch या बटनावर क्लिक करावे.



६) आता तुम्हाला तुमचा मतदान कार्ड Number ,तुमचे नाव ,राज्य ,मतदार संघ ,व तुमचा Phone Number दिसेल त्यानंतर खाली तुम्हाला Send Otp या बटनावर Click करावे लागेल 




७) त्त्यानंतर तुम्हाला आलेला Otp टाकून Verify करायचा आहे 








८) त्यानंतर हा Capcha तुम्हाला टाकावा लागेल तो टाकल्यानंतर Download Epic या वर क्लिक करावे 




९) तुमचे मतदान कार्ड येथे डाउनलोड झाल्याचे तुम्हाला दिसेल त्यानंतर ही Pdf File तुम्ही जतन करून ठेवू शकतात किवा प्रिंट करून ठेवू शकतात